दोन महिलांनी गोव्याला बोलावले, तिथे घडलं असं काही की पुण्यात येऊन त्याने जीव सोडला

Pune Man Suicide: पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जुगारात पैसे हरल्याने एका व्यक्तीने आपलं आयुष्य संपवलं आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 9, 2023, 12:41 PM IST
दोन महिलांनी गोव्याला बोलावले, तिथे घडलं असं काही की पुण्यात येऊन त्याने जीव सोडला  title=
Frustrated after losing money in gambling pune man committed suicide

सागर आव्हाड, झी मीडिया

पुणेः दोन महिलांनी त्यांना गोव्याला येण्यास भाग पाडले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पुण्यातील व्यक्तीला तिथे गेलाही. तिथे गेल्यावर ऑनलाइन जुगार आणि कसीनो खेळण्यास सांगितले. मात्र, गोव्याहून परतल्यावर असं काही घडलं की पुण्यातील व्यक्तीने स्वतःचे जीवन संपवले. विकास शिवाजी टिंगरे  (वय 50, रा. विठ्ठल मंदिर जवळ धानोरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Pune Man Suicide)

पुण्यातून गोव्याला गेले होते

गोवा येथे विकास यांना ऑनलाइन जुगार आणि कसीनो जुगार खेळण्यासाठी बोलावले होते. जुगारामध्ये ते जिंकल्यानंतरही त्याला पुण्याला जाऊन दिले नाही.व त्याला पुन्हा जुगार खेळण्यास भाग पाडले. यानंतर मात्र जुगारात ते पैसे हरले. त्यामुळं ते निराश झाले होते. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलाने दाखल केली तक्रार

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरी जकात नाका लोहगाव या ठिकाणी २३ मे रोजी हा प्रकार घडला आहे. विकास शिवाजी टिंगरे (वय ५०, रा. विठ्ठल मंदिर जवळ धानोरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अप्रिता दास (वय 35) आणि सुश्मिता दास (वय 33) या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गेश विकास टिंगरे (वय 21) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

जुगारात पैसे हरले

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे वडील विकास टिंगरे यांना आरोपी महिलांनी वारंवार फोन करून जुगार खेळण्यासाठी गोवा येथे बोलावले. त्यांना ऑनलाइन जुगार आणि कसीनो जुगार खेळण्यासाठी भाग पाडले. यामध्ये ते पैसे जिंकले देखील होते. मात्र पैसे जिंकल्यानंतरही आरोपी महिलांनी त्यांना कॅश आउट होऊ दिले नाही. त्यांना पुन्हा जुगार खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र ते जुगारात हरल्याने निराश झाले होते. पुण्यात परतल्यानंतर त्यांनी २३ मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत. 

पुण्यात बायकोचे न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकले

विकृत पतीने स्वतःच्या पत्नीचे फेसबुकवर न्यूड फोटो अपलोड केले. तसंच, पोस्टमध्ये माझ्या बायकोला भेटायचे असेल तर लोकेशन वर जा, असंही त्याने लिहलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पत्नीला पतीच्या कृत्याबाबत कळताच तिने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे.