Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video

Pune Railway station, viral video:  पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे. 

Updated: Aug 5, 2023, 10:15 PM IST
Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video title=
Pune Railway station viral video

Pune Railway station: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) वाढल्याचं चित्र आहे. कोथरुड (Kothrud) परिसरात 18 जुलैला पहाटे चार वाजता दहशतवाद्याला (Pune Terrorist) पकडण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी त्याता व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला होता. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुणे रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway station) सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. 

पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानकाच्या समस्यांसंदर्भात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी (Freestyle Fighting At Pune Railway Station) सुरू होती. ही हाणामारी एवढी भयानक होती. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हाणामारी करणार्‍या दोघांमधील एक जण दुसर्‍याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता आणि खाली पडणार्‍या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता. 

आणखी वाचा - पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

पुणे रेल्वे स्टेशनवरची ही घटना येथे घडणारी पहिली नसून, येथे अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पाहा Video

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहे. या रेल्वे स्थानकापेक्षा नव्याने शहरात तयार झालेल्या मेट्रो स्थानकाची सुरक्षा मजबूत असल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगामी काळात घडणारी अनुचित घटना टाळण्यासाठी आत्ताच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. पुणे रेल्वे स्टेशन सर्वात वर्दळीचं रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे येत्या काळात अशा घटना होऊ नयेत, याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे.