कल्याणमध्ये चौथ्या दिवशीही धुमसतेय डम्पिंग ग्राऊंडची आग

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आज चौथ्या दिवशीही धुमसतेय.

Updated: Mar 13, 2018, 10:16 AM IST
कल्याणमध्ये चौथ्या दिवशीही धुमसतेय डम्पिंग ग्राऊंडची आग  title=

कल्याण : कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आज चौथ्या दिवशीही धुमसतेय.

गेल्या तीस वर्षांपासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जातो. या क्षेपण भूमीची क्षमता संपून अनेक वर्ष उलटली आहेत. तरी इथे पालिकेच्या घंटागाड्या सातत्यानं इथे टाकत असतात. 

चार दिवसांपूर्वी डम्पिंग ग्राऊंडला आग लागली, तेव्हापासून त्यावर उपाययोजना सुरु आहे... पण ती इतकी तोकडी आहे, की परिसराच्या दोन किलोमीटरच्या परिसरात नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय.

रोज दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कचऱ्याच्या ढिगात साचलेला मिथेन वायू पेटतो... आणि धुराचे लोट आसमंत व्यापून टाकतात. नागरिकांना श्वासनाला त्रास होतोय.

गेल्या चार दिवसांत पालिकेनं आग विझवण्यासाठी 300 टँकर पाणी फवारलंय. पण कचऱ्याच्या ढिगांमध्ये साठलेल्या मिथेनमुळे काही केल्या आग विझत नाहीय.

कल्याण डोंबिवली महापालिकेने एक वेगळी टीम तयार केलीय. पण काही केल्या आग विझता विझत नाही.

असं असताना आयुक्तांनी युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत आहे.