मुंबईतील इमारतीच्या 13व्या मजल्यावर चढला महाकाय अजगर; पण गच्चीवरील दृश्य पाहून सारेच हादरले

Indian rock python: घाटकोपर येथील एका इमारतीत अजगर सापडल्याचे समोर आले आहे. इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन या अजगराला बाहेर काढण्यात यश आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 27, 2023, 11:15 AM IST
मुंबईतील इमारतीच्या 13व्या मजल्यावर चढला महाकाय अजगर; पण गच्चीवरील दृश्य पाहून सारेच हादरले  title=
four foot long Indian rock python rescued from ghatkoper mumbai

मुंबईः मुंबईतील घाटकोपर (Ghatkoper)  येथे चार फूट लांबीचा अजगर आढळला सापडला आहे. घाटकोपर पश्चिम येथील एका टॉवरमध्ये 13व्या मजल्यावर अजगर सापडला आहे. मोठ्या सोसायटीत अजगर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्पमित्रांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली आहे. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केले आहे. मात्र इतक्या उंचीवर हा अजगर पोहोचला कसा याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Snake Found On Mumbai Building)

इमारतीच्या गच्चीवर फसला होता साप

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका आयटी फर्मसाछी काम करणाऱ्या प्राणी मित्र सूरज साहा यांना मंगळवारी घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस रोडवर असलेल्या व्रज पॅराडाइज बिल्डिंगच्या एका छतावर भारतीय रॉक अजगर दिसला. हा अजगर सिमेंटमध्ये फसला होता. कारण इमारतीच्या गच्चीवर बांधकाम सुरु होते. अजगराला अशा स्थितीत पाहिल्यानंतर आम्ही लगेचच वनविभागाला माहिती दिली, अशी माहिती सूरज साहा यांनी दिली. 

 संरक्षित वन्यजीव प्रजाती 

अजगर हा संरक्षित वन्यजीव प्रजाती होता. अजगराला वाचवण्यासाठी मुंबई परिक्षेत्र वन अधिकारी राकेश भोईर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. साहा म्हणाले, "अजगर पाहिल्यानंतर कोणीही त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला नाही ही चांगली गोष्ट आहे. प्राणी मित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे लोकांना कळले की सापांना इजा करणे किंवा मारणे बेकायदेशीर आहे.

रहिवासी भागात अजगर कसा आला?

पावसाळ्यात सहसा साप बैठ्या घरातील कोपऱ्यात किंवा बिल्डिंगच्या गार्डनमध्ये आढळतात. कारण पावसाळ्यात त्यांच्या बिळांमध्ये पाणी भरते. अशावेळी ते आसरा शोधत घरांमध्ये किंवा घराच्या परिसरात येतात. पाण्यापासून वाचण्यासाठी ते इमारतीच्या छतापर्यंत जाऊन पोहोचतात. भारतीय रॉक अजगर हे जंगलात कितीही उंचीपर्यंत पोहोचू शकतात. या प्रजातींच्या अजगरांना उत्कृष्ट गिर्यारोहक म्हणून ओळखले जातात कारण ते झाडांवर आणि अगदी खडकाच्या पृष्ठभागावर सहज चढू शकतात.

मुंबईत मुसळधार पाऊस 

हवामान विभागाने मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मुंबई आणि उपनगरात गुरुवार दुपारपर्यंत अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, सरकारी आणि खासगी शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे.