Former NCP Corporator Pune Died In Shooting: पुण्यामधील नाना पेठे येथे रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये वनराज यांच्यावर उपचार सुरु होते. वनराज यांच्या मृत्यूच्या बातमीला पुण्याचे सह-पोलीस आयुक्त राजन कुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. गोळीबार केल्यानंतर वनराज यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. कोयत्याने वार केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
रविवारी रात्री पोलिसांनी या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. "आज रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर (अजित पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक) हे त्यांच्या चुलत भावाबरोबर इनामदार चौकात उभे होते. त्यावेळे काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळावरील प्राथमिक पहाणीनुसार या दोघांवर धारधार शस्त्रांनीही हल्ला करण्यात आला," असं सह-पोलीस आयुक्त शर्मा यांनी सांगितलं.
#WATCH | Maharashtra: On death of Former NCP corporator Vanraj Andekar, Joint Commissioner of Police, Pune, Ranjan Kumar Sharma says, "Tonight around 9:30, Vanraj Andekar (Former Corporator of Ajit Pawar's NCP faction) was standing with his cousin at Imaandar Chowk. Some people… pic.twitter.com/GzZeUm4vIK
— ANI (@ANI) September 1, 2024
तसेच पुढे बोलताना, "या प्रकरणासंदर्भात आमच्या पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि इतर तुकड्यांनी तपास सुरु केला आहे. आरोपींना शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत तरी आरोपी कोण आहेत आणि त्यांनी हल्ला का केला याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणामध्ये काही नामांकित लोकांची नावं समोर आली आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. वनराज यांचा मृत्यू धारदार शस्त्राने हल्ला केल्याने झाला आहे," असं शर्मा यांनी सांगितलं.
या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आंदेकर उभे असताना हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. त्यानंतर या दोघांवर कोयत्याने हल्ला केला. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा हल्ल्याशी काही संबंध आहे या याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.