आधी महिला कॅशिअरचा काटा काढला, मग माजी मॅनेजरनेच बँक लुटली, पुढे काय झालं?

माजी बँक मॅनेजरनेच ( Bank Maneger) आपल्याच बँकेवर त्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

Updated: Jul 30, 2021, 08:46 PM IST
आधी महिला कॅशिअरचा काटा काढला, मग माजी मॅनेजरनेच बँक लुटली, पुढे काय झालं? title=

प्रथमेश तावडे झी 24 तास, पालघर : कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी बँकेच्या माजी मॅनेजरच दरोडेखोर बनला. आपल्याच बँकेवर त्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पण बँकेत आलेल्या दोन तरूणांच्या हुशारीमुळे त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. या तरुणांच्या हुशारीमुळे या माजी मॅनेजरला आता जेलची हवा खावी लागतेय. नक्की का आणि कुठे हा प्रकार घडलाय, हे सविस्तर जाणून घेऊयात. (former bank maneger anil dubey robs his own bank in  virar and killed bank maneger)

अनिल दुबे (Anil Dubey) असं या माजी बँक मॅनेजरचं नाव. अनिल दुबे आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) मॅनेजर पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यानं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्यात त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यानं तो प्रचंड अस्वस्थ होता. त्याला बँकेबाबत सर्व माहिती होती. त्यामुळे त्यानं आपलीच बँक लुटण्याचा प्रयत्न केला. 

बँक लुटण्याचा सर्व प्लॅन तयार झाला.  अनिलनं गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बँक बंद झाल्यानंतर मास्क लावून धारदार शस्त्र घेऊन बँकेत प्रवेश केला. पण यावेळी बँकेत असलेल्या असिस्टंट मॅनेजर योगिता वर्तक आणि कॅशिअर श्रद्धा देवरुखकर उपस्थित होत्या. या दोघींनी सायरन वाजवण्याचा प्रयत्न केला. पण दुबेनं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला. यात योगिता वर्तक या महिलेचा जागीच मृत्यू झाला.  तर कॅशियर श्रद्धा देवरुखकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुदैवाने त्या वाचल्या.

या दोघींना गपगार केल्यानंतर दुबे बँकेतील रोकड आणि दागिने पळवून नेण्याच्या तयारीत होता. पण इथेच त्याचे ग्रह फिरले. तिथं दोन तरुण उपस्थित होते. आदिल आणि जेसिका या तरुणांनी फिल्मीस्टाईल पाठलाग केला. या दोघांनी दुबेला धरलं. अखेर दुबे पोलिसांच्या हाती लागलाच.  या दोघांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल पोलिसांनी त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवलंय. या घटनेनं वसई-विरार परिसरात खळबळ उडालीय. बँकेचा मॅनेजरच दरोडेखोर बनला तर विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.