सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्याने माजी सैन्य अधिका-याची हत्या

केवळ सिगरेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून पुण्यात माजी सैन्य अधिकारी कॅप्टन बाली यांचा खून करण्यात आलाय. पुण्यातील कॅम्प परिसरात कॅप्टन बाली रस्त्यावर राहात होते. 

Updated: Feb 12, 2018, 08:58 PM IST
सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्याने माजी सैन्य अधिका-याची हत्या title=

पुणे : केवळ सिगरेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून पुण्यात माजी सैन्य अधिकारी कॅप्टन बाली यांचा खून करण्यात आलाय. पुण्यातील कॅम्प परिसरात कॅप्टन बाली रस्त्यावर राहात होते. 

अशी केली हत्या

१ फेब्रुवारीला त्यांचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून कऱण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी शोध घेत एकाला अटक केलीय. रॉबिन लाझरस असं या आरोपीचं नाव आहे. सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्याने कॅप्टन बालींचा खून केल्याचं आरोपीनं मान्य केलंय. 

पुण्यात हत्येच्या आणखीही घटना

दरम्यान, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा चहा दिला नाही, म्हणून खून केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीनं दिलीय. किसन मुंडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो कोल्हटकर यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करायचा. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली होती. एरंडवणे परिसरातील मैथिली अपार्टमेंटमध्ये कोल्हटकर राहतात. त्यांच्याकडे मदतनीस म्हणून कामाला येणारा किसन मुंडे दीपाली यांच्याकडे सारखा काहीतरी खायला मागायचा. 

रागाच्या भरात खून

घटना घडली त्या दिवशी त्यानं त्यांना चहा मागितला होता. त्याला दिपाली यांनी नकार दिल्यानंतर त्यानं रागाच्या भरात खून केला. पोलीसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयानं त्याला १६ फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.