अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या एसपीज् बिर्याणी हाऊसने तब्बल २५ वर्षे पूर्ण केली आहेत. स्वादिष्ट पदार्थ, उत्तम सेवा, आरामदायी व प्रशस्त वातावरण ही एसपीज् बिर्याणीजची गेली अनेक वर्षे सातत्याने ओळख असून ग्राहकांचा हा विश्वास अधिक दृढ करत एसपीज् बिर्याणीने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अफाट कष्ट, चिकाटी, जिद्द, प्रामाणिकपणा आणि कामाच्या गुणवत्तेवर जवाहर चोरगे यांनी १९९४ साली हा प्रवास सुरू केला. ज्या प्रवासात आता नवीन पर्वात पाऊल ठेवताना ग्राहकांना अद्वितीय आनंद आणि अनुभव देण्यासाठी काही नवीन सिग्नेचर डिशेस देखील सादर केल्या आहेत. या सिग्नेचर डिशेसमध्ये आमिर खान स्पेशल दम बिर्याणीचा समावेश आहे.
नुकतंच प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता आमिर खानने एसपीज् बिर्याणी हाऊसला भेट देऊन आमिर खान स्पेशल दम बिर्याणी या डिशचं अनावरण केलं. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल आणि एसपीज् बिर्याणी हाऊसचे संचालक जवाहर चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
जवाहर चोरगे यांनी १९९४ मध्ये एका छोट्या जागेत फारसं भांडवल नसतानाही तहा व्यवसाय सुरू केला. बिर्याणी हा पदार्थ नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला आहे. सामान्य माणसाच्या आवाक्यात असेल आणि संपूर्ण कुटुंबाला आनंद घेता येईल हे लक्षात घेऊन एसपीज बिर्याणी हाऊस सुरू झालं.
अल्पावधीतच पुणेकरांनी या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद दिला. हैद्राबाद येथील पॅराडाईस या बिर्याणी हाऊसला भेट दिल्यानंतर बहुमजली बिर्याणी हाऊसची कल्पना सुचली पुण्यात उभी राहली बिर्याणी हाऊसची ही भव्य तीन मजली वास्तू. एका वेळी अडीचशे ग्राहकांची बैठक व्यवस्था इथं करण्यात आली आहे. सर्व कुटुंबीयांना एकत्रितपणे आस्वाद घेता यावा यासाठी सोयीस्कर इंटेरियर आणि बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण, पूर्णत: वातानुकुलित आणि दुचाकींसाठी असणारी पार्किंगची सोय यांमुळे खवय्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एसपीज् मध्ये पार्सल सेवेची वेगळी सोय असून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारच्या बिर्याणी येथे उपलब्ध आहेत.. या ठिकाणी दरवर्षी प्रसिध्द एसपीज् बिर्याणी फेस्टव्हलमध्ये खास नव्या डिशेसचा स्वाद पुणेकरांना घेता येतो. याबरोबरच शाकाहारी खवय्यांसाठी खास शाही व्हेज दम बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि अख्खा मसुर मसाला यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
बिर्याणी फेस्टीव्हलच्या निमित्ताने मुंबई, लखनऊ, हैद्राबाद यांसारख्या विविध प्रांतांतील बिर्याणी डिशेसची पर्वणी पुणेकर खवय्यांना चाखायला मिळत असते. बिर्याणीचे विविध प्रकारांमुळे एसपीज् बिर्याणीने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
य़ेथे मिळणारे पदार्थ...
एसपीज बिर्याणी हाऊसमध्ये साजूक मटण दम बिर्याणी, एसपीज मटण केशरी दम बिर्याणी, एसपीज् मटण दम बिर्याणी, गावरान चिकन बिर्याणी यांसारखे विविध बिर्याणीचे प्रकार चाखायला मिळतात. याशिवाय मटण हंडी, मटण फ्राय, मटण मसाला, खीमा मसाला, मटण कोल्हापूरी, स्पेशल गावरान हंडी, गावरान चिकन मसाला, गावरान चिकन फ्राय आदी पदार्थांचा समावेश आहे. तसेच कोळंबी पुलाव,सुरमई फ्राय,ओले बोंबील फ्राय,सोडे मसाला, बोंबील, सुकट चटणी, एग मसाला, एग भुर्जी यांसारख्या वैविध्यपूर्ण पदार्थांची लज्जत येथे चाखता येते. शाकाहारी पदार्थांमध्ये व्हेज मराठा, आलू मटर, ग्रीन पीस मसाला, ग्रीन पीस मसाला, दाल फ्राय इत्यादी डिशेसचा समावेश आहे.