मासेमारी करणाऱ्या दाम्पत्यांचा खाडीत बुडून मृत्यू

रायगड येथील एका दाम्पत्याचा धरमतर खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे दाम्पत्य गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

Updated: Aug 30, 2017, 12:23 PM IST
मासेमारी करणाऱ्या दाम्पत्यांचा खाडीत बुडून मृत्यू title=

अलिबाग : रायगड येथील एका दाम्पत्याचा धरमतर खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे दाम्पत्य गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

हे दाम्पत्य मच्छीमारीसाठी धरमतर खाडीत गेले होते. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. सचिन कमलाकर पाटील आणि साक्षी सचिन पाटील  असे या दाम्पत्याचे नाव आहे.अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ते वाहून केल्याचे सांगण्यात येत आहे.