मुंबईला येणा-या ट्रॅव्हल बसला आग, दोन मृत्युमुखी

गोव्यावरून कोल्हापूर मार्गे मुंबईला जाणा-.या ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Nov 24, 2017, 08:02 AM IST
मुंबईला येणा-या ट्रॅव्हल बसला आग, दोन मृत्युमुखी title=

मुंबई : गोव्यावरून कोल्हापूर मार्गे मुंबईला जाणा-.या ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अचानक लागलेल्या आगीत २ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच समजतं. इतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलंय. रात्री साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील लोंघे गावाजवळ हा अपघात घडला.  

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाजवळ पहाटे ४ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. आत्माराम ट्रॅव्हल्स ही बस गोव्यावरुन कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला होती निघाली. मिळालेल्या माहितीनुसार, एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसला भीषण आग लागली. दोन्ही मृत प्रवासी पुण्याचे असून बंटी भट आणि विकी भट अशी त्यांची नावं आहेत.

तर आग लागल्याची बाब ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर त्याने प्रवाशांना बाहेर ओढून काढलं. काही जखमी प्रवाशांना उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.