छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव ; 6 परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मध्यरात्री लागलेल्या आगीत  हे कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. 

आकाश नेटके | Updated: Dec 31, 2023, 08:14 AM IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव ; 6 परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणाऱ्या एका कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटली आहे. या आगीत सहा परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या आगीच्या घटनेतून चार कामगारांनी स्वतःचा जीव वाचवलाय. मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटानस्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यानंतर तब्बल चार तासांनी आग विझवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर 216 मध्ये 'सनशाइन इंटरप्राईजेस' कंपनीत रविवारी झालेल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. बिहार राज्यातील हे कामगार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग भडकतच होती. हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री ही भीषण आग लागली होती या आगीत मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (32), इक्बाल शेख (18), ककनजी (55), रियाजभाई (32), मरगुम शेख (33) यांचा मृत्यू झाला आहे. यातील काही कामगारांचा गुदमरून मृत्यू इराला असावा, असा अंदाज आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि कंपनीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री कारखाना बंद होता. त्यामुळे आग लागली तेव्हा कामगार झोपले होते. आग लागली तेव्हा त्यावेळी इमारतीत सुमारे 10-15 लोक अडकले होते, असे स्थानिकांनी सांगितले.

वाळुज एमआयडीसीमध्ये असलेल्या सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम केले जाते. या कंपनीमध्ये 15 कामगारांसह एक महिला व दोन लहान मुले असे एकूण 18 जण काम करत होते. कंपनीतले बहुतांश कामगार हे बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी आहेत. मृतांमधील काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. कामगार झोपेत असताना ही आगीची घटना घडली. काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्याने उड्या मारल्या त्यामुळे ते बचावले. तर आग भडकल्याने सहा कामगार आतच अडकले होते.

दरम्यान, वाळूज भागात लागलेल्या आगीत सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आलेली आहे,  आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही पण आगीत लाखो रुपयांचा सामान जळाला आहे आणि जीवित हानी सुद्धा झालेली आहे , आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेला आहे पुढील प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.