सांगली : सांगलीतील विटा - मायणी रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार घडलाय. केमिकल टँकर आणि भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर आग निर्माण झाली. त्यानंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ तयार केला असून सोशल मीडियात व्हायरल होतोय. नांदेडमधील विटा आणि तासगाव नगर पालिकेच्या जवळ हा प्रकार घडला. विटा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, अग्नीशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली.
— renuka dhaybar (@renu96dhaybar) December 22, 2018
विटा येथील रस्त्यावर भरधाव ट्रक केमिकलच्या टँकरला येऊन आदळला आणि हाहाकार माजला. बराच वेळ धुर आणि आगीचा लोळ पाहायला मिळत होता. केमिकलचा टॅंकर असल्याने आग आणखीनच भडकली. क्षणार्धात दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या दोन्ही गाड्यांमध्ये किती जण होते ? याबद्दल नेमकी माहिती समोर आली नसली तरी एकूण 3 ते 4 जण असल्याचा अंदाज लावला जात आहे.
आग लागल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. केमिकलचा टॅंकर असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणात दिसत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.