मेथीची भाजी खाल्यानं वृद्धाचा मृत्यू

 धोंडिबा कदम यांना चक्कर येऊन पोटात मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरू झाला.

Updated: Dec 22, 2018, 04:21 PM IST
मेथीची भाजी खाल्यानं वृद्धाचा मृत्यू  title=

नांदेड : मेथीची भाजी खाल्यानं विषबाधा होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील अन्य सहा जणांवर उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कळगावमध्ये ही घटना घडली. ६५ वर्षीय धोंडिबा कदम यांचा विषबाधेतून मृत्यू झाला. गुरुवारी कदम कुटुंबीयांनी मेथीची भाजी आणि भाकरी खाल्ली होती. त्यानंतर सर्वजण शेतात कामालाही गेले.  मात्र धोंडिबा कदम यांना चक्कर येऊन पोटात मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरू झाला.

उपचार सुरु

धोंडीबा यांच्या पाठोपाठ पद्मिनी कदम ,आनंदा कोंडीबा यांनाही असाच त्रास सुरू झाला. या तिघांना उमरी ग्रामीण रुगणलाय दाखल करण्यात आलं. यानंतर आणखी चार जणांना उलट्या आणि जुलाब सुरु झाल्यानं त्यांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.रात्रभर सर्वांवर उपचार करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान कोंडीबा कदम यांचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांना नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

जेवणातून विषबाधा   

दरम्यान, त्यादिवशी उमरी बाजारातून मेथीची भाजी आणली होती असे नातेवाईकांनी सांगितलं. तिच भाजी सर्वांनी खाल्ली. कदम कुटुंबासह गावातील आठ-दहा घरांना एकाच नळातून पाणी मिळत त्यामुळे पाण्यातून नव्हे तर जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेत. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.