Ahmednagar Crime News : डोक्याला पिस्तुल लावून गुन्हा केल्याच्या घटना आपण चित्रपटांमध्ये पाहत असतो. मात्र, असाच फिल्मी थरार अहमदनगरमध्ये प्रत्यक्षात पहायला मिळाला आहे. अहमदनगरच्या जामखेड येथे आरोपीने पोलीसावर पिस्तुल रोखले स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जामखेड शहरातील तपनेश्वर येथे आरोपींनी एका तरुणाच्या डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली.
दरम्यान, आरोपी प्रताप पवारने पिस्तुल पोलीसावर रोखत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून त्याला जखमी केले. कार पळवणारे तीनही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातील पोलिसाच्या गोळीबारात जखमी झालेला आरोपी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अंगावर चिखल उडाला म्हणून पुण्यात टोळक्याने कोयत्यांनी वाहनांची तोडफोड केली. पुण्यातील डोनजे भागात ही घटना घडली आहे. इजाज मुनीर शेख यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिवप्रसाद चोरघे यासह इतर 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला असतान सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज व दुचाकीवरील तरुणांची शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली. स्थानिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवली. दुसऱ्या दिवशी तोंडाला रुमाल बांधून, हातात कोयते घेऊन 10 ते 12 जण दुचाकींवरुन आले व मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एका चारचाकी आणि एका मोटारसायकलची तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इजाज व त्याच्या घरातील सर्व सदस्य घाबरले होते. तसेच परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.