लातूर एसटी स्थानक परिसरात फिल्मी स्टाईलने महिलांची मारामारी

बसस्थानक परिसरात उभे राहण्यावरून दोन व्यवसाय करणाऱ्या महिलांची भर रस्त्यावरच हाणामारी सुरु झाली आणि...

Updated: Nov 25, 2017, 10:47 PM IST
लातूर एसटी स्थानक परिसरात फिल्मी स्टाईलने महिलांची मारामारी title=

लातूर : शहर बसस्थानक परिसरात खुलेआमपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असतात. खुलेआम सुरु असलेल्या या प्रकाराकडे लातूरचे गांधी चौक पोलीस नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. मात्र आता हा प्रकार इतका विकोपाला गेला आहे की बसस्थानक परिसरात उभे राहण्यावरून दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची भर रस्त्यावरच हाणामारी सुरु झाली.

हाणामारी कॅमेरऱ्यात कैद 

लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकापुढेच ही मारामारी सुरु होती. ज्यात एक महिला ही दुसऱ्या महिलेला मारत असल्याचे दिसून येत आहे. या दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची हाणामारी उपस्थित प्रवाशांनी कॅमेरऱ्यात कैद केली.

लातूर पोलिसांचे दुर्लक्ष का?

विशेषबाब म्हणजे बसस्थानकात पोलीस चौकी असतानाही कुठलाही पोलीस कर्मचारी या मारहाणीकडे फिरकला सुद्धा नाही. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून अशा महिलांचा कायमस्वरूपी बंदोबस्त लातूर पोलीस कधी करणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत.