फीफा वर्ल्ड कप : नवी मुंबईतील ४ कोटी खर्च करुन केलेले मैदान सिडको तोडणार

नवी मुंबईत फीफा वर्ल्ड कप होणार आहे , या सामन्याच्या सरावासाठी नवी मुंबईतील स्पोर्ट्स क्लबमध्ये ४ कोटी खर्च करून मैदान बनवण्यात आले आहे.

Updated: Aug 5, 2017, 03:54 PM IST
फीफा वर्ल्ड कप : नवी मुंबईतील ४ कोटी खर्च करुन केलेले मैदान सिडको तोडणार title=

नवी मुंबई : येथे फीफा वर्ल्ड कप होणार आहे , या सामन्याच्या सरावासाठी नवी मुंबईतील स्पोर्ट्स क्लबमध्ये ४ कोटी खर्च करून मैदान बनवण्यात आले आहे. मात्र, वादामुळे हे मैदान सामने झाल्यावर तोडून टाकण्याचे आदेश सिडकीने दिलेत. सिडकोच्या या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, सिडकोला मेम्बरशिप नाममात्र दरात न मिळाल्याने सिडकोने हा धक्कादायक आणि अजब निर्णय घेतलाय, असा आरोप केला जात आहे. येत्या ऑक्टोम्बर महिन्यात होणाऱ्या फीफा वर्ल्ड कपचे  ५ सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडीयमवर होणार आहेत. या सामन्यांसाठी सराव व्हावा म्हणून नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये ४ कोटी रुपये खर्च करून मैदान तयार करण्यात आले आहे.

यासाठी स्पोटर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी प्रत्येकी ४ हजार रुपये काढून ४ कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे फिफा वर्ल्ड कप संपल्यानंतर ते तोडून काढण्याची नोटीस सिडकोने बाजावली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान फीफा वर्ल्ड कपनंतर नवी मुंबईतील सर्व सामान्य खेळाडूंना खेळत येईल. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी नवी मुंबईतील खेळाडूंचे भविष्य उध्वस्त करण्याचे काम सिडकोचे अधिकारी करत आहेत. सिडकोचे अधिकारी फिफाच्या एनओसीच्या नावाखाली आम्हाला ब्लॅक मेल करीत असल्याचा आरोप स्पोर्ट्स क्लबने केलाय.