धक्कादायक, वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मुलाची नैराश्येतून आत्महत्या

 वडिलांचा (Father Death) कोरोनाने (Coronavirus) मृत्यू झाल्याने मुलाने नैराश्येतून आत्महत्या (son commits suicide due to depression) केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

Updated: Apr 16, 2021, 09:08 AM IST
धक्कादायक, वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मुलाची नैराश्येतून आत्महत्या title=
संग्रहित फोटो

सोलापूर : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.   (Coronavirus in Maharashtra)  रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. आता एक धक्कादायक बाब पुढे येत आहे. लोक चिंतेत आहेत. त्यातच त्यांना नैराश्याने ग्राहल्याचे दिसत आहे. सोलापुरात ( Solapur) अशीच एक नैैराश्यातून मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. वडिलांचा (Father Death) कोरोनाने (Coronavirus) मृत्यू झाल्याने मुलाने नैराश्येतून आत्महत्या (son commits suicide due to depression) केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

 सोलापूरमधील संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकान उत्तीर्ण झालेला आणि अनेक दैनिकांमध्ये काम करणाऱ्या प्रकाश जाधव या तरुण पत्रकाराने डाव्या हाताची नस कापून राहत्या घरीच आत्महत्या केली. प्रकाश जाधव यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र पित्याच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने स्वतःचीच जीवनयात्रा आधीच संपवली. 

प्रकाशची आई आणि  वाहिनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावरही सोलापुरातील हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत.घरातील साऱ्याच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने प्रकाश आणि भाऊ सतीश हे दोघंही क्वारंटाईन कक्षात राहत होते. मात्र मानसिक मनोबल खचलेल्या प्रकाशने टोकाचे पाऊल उचलून स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. 

प्रकाश याने डाव्या हाताची नस कापल्याने त्याला  बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा भाऊ सतीश जाधव हा सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे. प्रकाश जाधव सारख्या हरहुन्नरी युवा पत्रकाराने आत्महत्या केल्याने सोलापुरातील पत्रकारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्मशानभूमीत जागाच नाही

 सोलापूरच्या रुपभवानी स्मशानभूमीमध्ये काल अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा देखील उपलब्ध नसलयाची स्थिती होती. बुधवारी सोलापुरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा देखील उपलब्ध नव्हती. काल मृत्यू पावलेल्या रुग्णांचा अंत्यसंस्कार झाल्यानन्तर त्यांची राख सावडण्याआधीच काल पुन्हा स्मशानभूमीत मृतदेह आणण्यात आले होते, स्मशानभूमीत ही राख साफ करण्यासाठीसुद्धा कुणी उपलब्ध असल्याचे दिसत होते.

'घराबाहेर पडू नका'

 दरम्यान, लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सोलापूर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे. कामाव्यतिरिक्त रस्त्यावर भटकंती करणार्‍या 25 नागरिकांना फौजदार चावडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सात रस्ता परिसरामध्ये डबल सीट आणि सिंगल सीट विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे नाहक घरा बाहेर पडणे टाळावें असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून सोलापूरकरांना करण्यात आले आहे.