घरी स्वामी समर्थांचा पाठ; पूजा संपल्यावर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर बाप-लेकाचा मृत्यू

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्रात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. मुलाला वाचवता वडिल समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आलेय. 

Updated: Aug 28, 2023, 08:42 PM IST
घरी स्वामी समर्थांचा पाठ; पूजा संपल्यावर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर बाप-लेकाचा मृत्यू title=

Vasai Cccident News : वडिल आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. वसईच्या समुद्र किनाऱ्यावर ही विचित्र घटना घडली आहे. समुद्रात बुडाल्याने या दोघांचा मृत्यू झाला आहे. मुलगा समुद्रात बुडत असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत मुलगा हा अल्पवयीन असल्याचे समजते.  या घटनेमुळे वसई परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

शैलेंद्र मोरे आणि मुलगा देवेंद्र मोरे अशी या मृत बाप लेकाची नावे आहेत. वसई किल्ला समुद्रकिनार्‍यावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलगा 14 वर्षीय मुलगा पाण्यात पडला.  त्याला वाचवायला गेलेले त्याचे वडीलही बुडाले. रविवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. 

स्वामी समर्थांचा पाठ झाल्यावर गेले होते समुद्र किनाऱ्यावर

वसई पश्चिमेच्या ओम नगर मध्ये राहणारे देवेंद्र मोरे यांनी रविवारी घरी स्वामी समर्थांचा पाठ आयोजित केला होता. पूजा संपल्यावर निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी शैलेंद्र मोरे मुलगा घेऊन दुचाकीने वसई किल्ल्याजवळील समुद्रात गेले होते. निर्माल्य टाकल्यानंतर देवेंद्रे जेटीवरून सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावत जाऊन त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र, ते देखील समुद्रात बुडाले.एका प्रत्यक्षदर्शीने हे पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वसई पोलीस आता या दोघांच्या मृतदेहचा शोध घेत आहेत.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वसईतील  नागरिक दहशतीत 

वसई पुर्वच्या एवरशाईन भागातील एनजी श्रीराम 1 या सोसायटीतील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे दहशतीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भटके कुत्रे सोसायटीच्या आवारात शिरुन लहान मुलांवर हल्ले करत असल्यानं मुलांना घराबाहेर पाठवण्यासाठी नागरिक घाबरतायेत. सोसायटीतील एका कथित प्राणी प्रेमीच्या दबावामुळे प्रशासन देखिल या भटक्या कुत्र्यांवर कारवाई करत नसल्याचा सोसायटीतील रहिवाशांनी आरोप केलाय. गंभीर घटना घडण्याआधी या भटक्या कुत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.