मधुकर पिचड यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

 पिचड यांनी आपली दुसऱ्या पत्नीच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे भिवंडी प्रांत कार्यालयातून आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळवला.

Updated: Oct 2, 2018, 11:18 PM IST
मधुकर पिचड यांच्या विरोधात लाक्षणिक उपोषण title=

अकोला : माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याविरोधात जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी लाक्षणिक उपोषण केलंय. पिचड यांनी आपली दुसऱ्या पत्नीच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे भिवंडी प्रांत कार्यालयातून आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळवला आणि आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप लहामटे यांनी केलाय.

याबाबत कार्यवाहीसाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी सचिव यांना त्यांनी वेळोवेळी निवेदनं दिलीत. मात्र, सरकार दरबारी धीम्या गतीने कामकाज चालू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी जयंतीला अकोले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं.