'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही'

३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी असताना सरकारनं  ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं आहे. 

Updated: Jun 25, 2017, 04:14 PM IST
'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही' title=

पुणे : ३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी असताना सरकारनं  ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात म्हंटलं आहे.

तर दीड लाखांवरचं कर्ज भरण्यासाठी सरकारनं वन टाईम सेटलमेंट योजना शेतक-यांना पुरवण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. कर्जमाफीचा निर्णय शेतक-यांचं पूर्ण समाधान करणारा नाही, त्यामुळे कर्जमाफी संदर्भात ज्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्याची पुर्तता करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी नियमित कर्ज भरणा-यांसाठीची अनुदानाची रक्कम पंचवीस हजारांवरुन वाढवून किमान पन्नास हजार रुपये करण्याची मागणीही त्यांनी केली.