शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू

शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आणि किसान क्रांती मोर्चाच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे.

Updated: Oct 21, 2017, 09:19 PM IST
शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू title=

चंद्रपूर : राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत आहे. त्यामुळं शासनावर आणि त्यातील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चंद्रपूर पोलिसात करण्यात आली आहे. 

मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी

शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आणि किसान क्रांती मोर्चाच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळं शेतकरी आत्महत्या करीत आहेत. 

सरकार हमीभाव देत नाही, त्यामुळे आत्महत्या

सरकार कधीच हमीभाव देत नाही, तो वाढवत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. याला कारणीभूत केवळ शासकीय धोरण आहे. आणि त्यामुळंच शासन आणि त्यातील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटले चालवावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.