शेतकऱ्यांकडून महामार्गाच्या कडेला शेतात हुरडा पार्ट्याचं आयोजन

हुरडा आणि गावरान जेवणाचा आस्वाद 

Updated: Dec 16, 2019, 10:30 PM IST
शेतकऱ्यांकडून महामार्गाच्या कडेला शेतात हुरडा पार्ट्याचं आयोजन title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : डिसेबर महिना आला की ज्वारी बहरात यायला सुरवात होते. ज्वारीच्या गोड वाणाची लागवड करत आता अनेक शेतकरी महामार्गाच्या कडेला असलेल्या आपल्या शेतात हुरडा पार्ट्याचं आयोजन करु लागले आहेत. हुरडा आणि गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांचीही गर्दी होई लागली आहे.

बांधावरचा हुरडा आता हायवे वर आला आहे. शेतातून तोडून आणलेल्या ज्वारीच्या कणसांना गवऱ्याच्या निखाऱ्यावर भाजलं की लगेच ती हाताने चोळुन त्याचे कवळे दाने हुरडा शौकींनाच्या ताटात दिले जातात. नगर औरंगाबाद महामार्गावर नेवाश्याजवळ असंच चित्र आहे. शेतकरी आपल्या शेतात गुळ भेंडी, दुध मोगरा अशा गोड ज्वारीच्या वाणाची लागवड करतात. डिसेंबरच्या सुरुवाती पासूनच ज्वारीत चांगले दाणे भरु लागले की खवय्यांसाठी हुरडा पार्ट्यांची इथे सुरवात होते. आणि म्हणूनच शेतीला जोड धंदा म्हणुनही या हुरडा विक्रीच्या व्यवसायात आता शेतकरी उतरले आहेत.

शेत शिवारातच निसर्गरम्य वातावरणात अनेक हौशी लोकही गरमागरम भाजलेल्या ज्वारीची मजा घेण्यासाठी थेट शिवारात येतात आणि हुरडा पार्टी साजरी करतात. या हुर्ड्या पार्टीची अजून एक खासियत म्हणजे चुलीवरचं जेवण. भाकरी, पिठलं, ठेचा, थालीपीठ, दही यासह विविध प्रकारच्या चटण्यांनी ताट अगदी भरून गेलेलं असतं.

शेती व्यवसायाबरोबरच या हुर्डा पार्टीतून आर्थिक बाजू वाढविण्यासाठी आणि या व्यवसायातून इतरांनाही रोजगार मिळवून दिला जात असल्याने शेतकऱ्यांनाही समाधान वाटतं.