मान्सूनपूर्व पावसामुळे अमरावतीत शेतकऱ्यांचं नुकसान

अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

Updated: Jun 6, 2018, 08:38 AM IST
 title=

अमरावती : अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.  या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तर पावसामुळे काही भागात वीजपुरवठाही खंडीत झाला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री करिता आणलेल्या हजारो क्विंटल तुर, हरभरा पिकांचे पोते पावसामुळे भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. 

अमरावती मध्ये आज मान्सून पूर्व पावसाने वाऱ्या सह अचानक पाऊस आल्याने  वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने अमरावती करांना उन्हाच्या उकड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे . मात्र  अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती शहरातील जनजीवन विस्कळीत झाले काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली  तर काही भागांमध्ये पिली ठेकेदार  पडले  त्यामुळे अमरावती शहराचा बरच भागातील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्री करिता आणलेल्या हजारो क्विंटल तुर , हरभरा पिकांचे पोते पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आले आहे .