शेतकरी आंदोलन : पुण्यात पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली

कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चाला परवानगी नाही. - पोलीस

Updated: Dec 8, 2020, 09:16 AM IST
शेतकरी आंदोलन : पुण्यात पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली title=

पुणे : महाविकासआघाडीसह कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. असं असताना या मोर्चाला परवानगी देण्यात आली नसल्याचे पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची घोषणा केली आहे. विविध विरोध पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील अलका टॉकीज चौकातून हा मोर्चा निघणार होता. सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा निघणार होता. मात्र आता पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चा निघणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चाला परवानगी देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मनसे तसेच ओबीसी संघटनांनी मोर्चाचा आयोजन केलं होतं. त्याला देखील पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आज भारत बंदच्या पार्श्वभुमीवर मोर्चा निघतो का हे अजून स्पष्ट झालेलं नाही.