फवारणीवेळच्या विषबाधामुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात फवारणीच्या वेळी विषबाधेमुळे दुस-या शेतक-याचा बळी गेलाय. 

Updated: Oct 14, 2017, 09:39 PM IST
फवारणीवेळच्या विषबाधामुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू title=

धुळे : धुळे जिल्ह्यात फवारणीच्या वेळी विषबाधेमुळे दुस-या शेतक-याचा बळी गेलाय. धुळे तालुक्यातील अजंग गावातली शेतकरी भीमरा माळी या शेतक-याला ९ ऑक्टोबरला फवारणी करताना विषबाधा झाली होती. त्यांच्यावर धुळ्यात रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

माळींच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात फवारणी करताना झालेल्या विषबाधांमुळे दुसरा बळी गेलाय. याआधी विरदेल गावातील दशरथ कोळी या तरुण शेतक-याचा फवणारीमुळे झालेल्या विषबाधामुळे मृत्यू झाला.

कृषी विभाग मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यात मश्गुल आहे. शेतक-यांचा मृत्यू होत असताना कृषी अधिकारी दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अन्य एका घटनेत अजनाळे गावातील धनाजी बागुल या शेतक-याच्या शेताचे परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान केल्यानं त्यानं आत्महत्या केली.