Fact Check : माकडं आणि भटक्या कुत्र्याच्या 'त्या' व्हिडीओमागील सत्य

माकडांच्या सावटाखाली होतं संपूर्ण गाव

Updated: Dec 19, 2021, 03:07 PM IST
Fact Check : माकडं आणि भटक्या कुत्र्याच्या 'त्या' व्हिडीओमागील सत्य  title=

विष्णु बुर्गे, झी मीडिया, बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लवूल गावांतील माकडांची नजर भटक्या कुत्र्यांच्या पिल्लावर होतील. संधी मिळताच ही माकडं भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना पळवून नेत आणि उंचीवरून त्यांना खाली फेकून देत. माकडांच्या या दहशतीखाली संपूर्ण गाव आहे अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण या व्हायरल बातमी मागचं सत्य आता समोर आलं आहे. 

व्हायरल बातमीमागील Fact Check 

झी चोवीस तासचे रिपोर्टर विष्णु बुर्गे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. भटक्या कुत्र्यांनी माकडांच्या पिल्लावर हल्ला केल्याची कोणतीच घटना घडलेली नाही. या सगळ्या घटनेचा कोणताही पुरावा नाही. या सगळ्या ऐकिवातल्या गोष्टी आहेत.

मात्र हे सत्य आहे की, गेल्या काही महिन्यांपासून माकडं भकटया कुत्र्यांना त्रास देत आहेत. काही माकडांनी कुत्र्यांच्या पिल्लांना छतावर नेऊन सोडलं. तर काहींना झाडावर ठेवलं.

काय आहे माकडं आणि कुत्र्यांच्या वादामागील सत्य?

यामध्ये त्या पिल्लांचा मृत्यू झाला. पण तो मृत्यू झाडावरून पडून नव्हता तर भुकबळीने या भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव गेला आहे.  (कुत्रा आणि माकडांच्या वादात ग्रामस्थ हैराण, पाहा नेमका काय प्रकार) 

गावातील माकडांच्या उच्छादामुळे लोकं भीतीने छतावर जात नाहीत. पिल्लांना छतावरून खाली येण्याचा रस्ता माहित नव्हता. तर पिल्लांना छतावर काहीच खायला मिळालं नाही. त्यामुळे त्यांचा भूक बळी गेलेला आहे. 

का झाला कुत्र्याच्या पिल्लांचा मृत्यू?

तर वन्यप्रेमींच म्हणणं आहे की, सामान्यपणे माकडं भटक्या कुत्र्यांवर हल्ला करत नाहीत. या प्रकरणात असे असू शकते की, माकडं त्या पिल्लांच्या त्वचेवर होणाऱ्या किटाणुंमुळे तेथून उचलून घेऊन जात असतील. असा प्राथमिक अंदाज आहे. 

मात्र या संपूर्ण प्रकरणावर अद्याप  वनविभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.