वसई : नालासोपाऱ्यात एका २० वर्षीय तरुणीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेकडील तानिया मोनार्च या इमारतीच्या तळमजल्याच्या जिन्यावर तिचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर हरिदास निरगुडे याला अटक केली आहे.
हरिदास याची या मुलीसोबत फेसबुकवरून मैत्री झाली होती. पिडीत मुलगी ही नवी मुंबईला राहणारी होती. रविवारी ही हरीदासला भेटण्यासाठी नालासोपाऱ्यात त्याच्या घरी आली. इथे शारिरीक संबध ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
हरिदास याने बुटाच्या लेसने पिडीत मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर कोणाला सुगावा लागू नये म्हणून तिचा मृतदेह घराबाहेर आणून टाकला आणि घरातून पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. नालासोपारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहेत.