Exclusive Interview of Rahul Narvekar Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गट नार्वेकर यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय अन्याकारक असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केली जात आहे. राहुल नार्वेकर यांच्या टीकेची झोड उठली आहे. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना... असे म्हणत निकालावर टीका करणाऱ्यांना राहुल नार्वेकर (Rahul Narwkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच निकालावर आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व आरोप प्रत्यारोंपवार विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करून आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्याचे दावा नार्वेकर यांनी केला आहे.