सकल मराठा महिला क्रांती मोर्चा समितीची स्थापना

 मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये एकाही महिलेला स्थान न दिल्याने मराठा महिलांनी सकल मराठा महिला क्रांती मोर्चा या राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

Updated: Sep 4, 2018, 11:22 PM IST

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये एकाही महिलेला स्थान न दिल्याने मराठा महिलांनी सकल मराठा महिला क्रांती मोर्चा या राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

१ सप्टेंबर ला पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीसाठी  मोर्चातल्या एकाही महिलेला निमंत्रण दिलं गेले नाही. तसंच यावेळी स्थापन करण्यात आलेल्या समितीमधूनही महिलांना डावललं गेल्याचा महिलांचा आरोप आहे. 

मात्र या महिला मोर्चाला मराठा मूक क्रांती मोर्चामधील महिलांनीच विरोध केलाय. दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या  वतीनं स्थापन करण्यात आलेल्या  समितीमध्ये महिलांचा समावेश करण्यात आलाय, असं शांताराम कुंजीर यांनी स्पष्ट केलंय.