जालन्यात लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं अचानक लँडिंग

जालन्यातील परतूरमध्ये भारतीय लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं अचानक लँडिंग करण्यात आलं. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मात्र, लष्कराच्या जवानांनी अचानक लँडिंग का केलं याची माहिती अजून कळू शकलेली नाही.

Updated: Aug 8, 2017, 02:04 PM IST
जालन्यात लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं अचानक लँडिंग title=

मुंबई : जालन्यातील परतूरमध्ये भारतीय लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं अचानक लँडिंग करण्यात आलं. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मात्र, लष्कराच्या जवानांनी अचानक लँडिंग का केलं याची माहिती अजून कळू शकलेली नाही.

सोमवारी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील माळरानावरही लष्कराच्या हेलिकॉप्टरचं अशाच प्रकारे दहा मिनिटांसाठी अचानक लँडिंग करण्यात आलं होतं. मात्र, परतूरमध्ये लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं रेल्वेगेट परिसरातील पारडगाव शिवारातील माळरानावर अचानक लँडिंग करण्याचं कारण कळू शकलेलं नाही. दरम्यान, दहा मिनिटांच्या लँडिंगनंतर दोन्हीही हेलिकॉप्टरनी पुन्हा टेकऑफ केलं.