यवतमाळ : नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकातील धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या हत्तीला जेरबंद करुन ताडोबाला रवाना करण्यात आलंय. दरम्यान यामुळे वाघिणीच्या शोध मोहीमेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वनविभागाच्या तावडीतून सुटलेल्या हत्तीनं एका महिलेला ठार केल्यानंतर अखेर या हत्तीला जेरबंद करण्यात आलं. चहांद गावातील अर्चना कुळसंगे या महिला हत्तीच्या हल्ल्यात ठार झाल्यात. तर पोहना गावात नामदेव सवाई हे वृद्ध हल्ल्यात जखमी झाले आहेत.
परिसरात वाघिणीसोबत आता हत्तीची दहशत पसरलीये. दरम्यान, 13 जणांना ठार मारणाऱ्या वाघिणीचा 22 दिवस लोटले तरी ठावठिकाणा लागला नाही.