पुणे : School Electricity Disconnection : जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात गेल्या आहेत. वीजबील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या या शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. (Electricity disconnection of 800 schools in Pune district)
तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात आहेत. शाळांचे वीजबिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्याने 792 शाळांची वीजजोडणी तोडली आहे. तर तब्बल 128 शाळांचे मीटर (School Electricity Meter) काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा अंधारात आहेत.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर राज्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शहरात 8 ते 12 वी पर्यंत तर ग्रामीण भागात 5 वी ते 12 पर्यंत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद होती. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आता सुरु झाली आहेत. मात्र, 800 शाळांना नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्युत बिल न भरल्याने 800 शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.