Election Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत

शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निर्विवाद आघाडी घेत नीलेश राणे यांचा पराभव केला.

सुरेंद्र गांगण | Updated: May 23, 2019, 05:55 PM IST
Election Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत title=

मुंबई : कोकण हे शिवसेनेच्या नेहमी पाठिमागे राहिले आहे. दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या खासदार विनायक राऊत हे दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे नवीनचंद्र बांदीवडेकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांना धूळ चारली आहे. राणे यांना आघाडी घेता आलेली नाही. त्यामुळे ते पराभवाच्या छायेत दिसून येत होते. विनायक राऊत यांनी १ लाख ७६ हजार ६९१ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, राऊत यांनी चांगले मताधिक्य देणार अशी घोषणा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली होती. त्यांनी ते प्रत्यक्षात  करुन दाखविले, असे विजयानंतर कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत हे विजयाच्या उंबरठ्यावर होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून  शिवसेनेचे विनायक राऊत हे  ९९ हजार ७२९ मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत होता. विनायक राऊत हे विद्यामान शिवसेनेचे खासदार होते. त्यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी दिली. ते पहिल्यांदा सोळाव्या लोकसभेत ते पहिल्यांदा सदस्य म्हणून निवडणून गेलेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले.

शिवसेना- भाजप युतीला धक्का देणार अशी प्रतिज्ञा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. तसेच त्यांचे पूत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांनीही आपलाच विजय असेल असा दावा केला होता. मात्र, सुरुवातीपासून नीलेश राणे यांना आघाडी घेता आली नाही. विनायक राऊत यांच्या बाजुने निकाल लागला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार विनाय राऊत यांनी विरोधी उमेदवांचा पराभव केला आहे. राऊत यांनी मतमोजणीच्या दिवशीही त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती आणि प्रत्येक टप्प्यामध्ये ही आघाडी वाढत गेली. दरम्यान, काँग्रेस उमेदवार बांदिवडेकर यांनीही दोन क्रमांकाची मते काही फेऱ्यांमध्ये घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे नीलेश राणे यांना या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. 

विनायक राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव 

विनायक राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  रत्नागिरीत त्यांना शुभेच्छा देताना राज्यगृहमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सोबत अन्य पदाधिकारी.

- शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र स्वाभिमा पक्षाचे नीलेश नारायण राणे पिछाडीवर, गिते यांना १ लाख ५०४ मते मिळाली आहेत.

-   शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना पाचव्या फेरीनंतर ३८ हजारांची आघाडी । नारायण राणे यांचे सुपूत्र नीलेश राणे पिछाडीवर

Election Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत आघाडीवर

- रत्नागिरीत शिवसेनेचे विनायक राऊत 31, 066 मतांनी आघाडीवर

- शिवसेनेचे विनायक राऊत तिसऱ्या फेरी अखेर २४२१५ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ३०३५, नीलेश राणे १३६६, 
रत्नागिरी - विनायक राऊत ४५९० नीलेश राणे १०९५
राजपूर - विनायक राऊत २८७१ नीलेश राणे ११५६
कणकवली - विनायक राऊत २१२९ नीलेश राणे २४०१
कुडाळ - विनायक राऊत २१०४ नीलेश राणे २५३२
सावंतवाडी - विनायक राऊत ३३११ नीलेश राणे २१९९
एकूण - विनायक राऊत १८०४० नीलेश राणे १०७४९
तिसऱ्या फेरीत विनायक राऊत एकूण ७२९१ मतांनी आघाडीवर

- शिवसेनेचे विनायक राऊत दुसऱ्या फेरी अखेर १६९२४ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ४२१५, नीलेश राणे १५२३, 
रत्नागिरी - विनायक राऊत ४३९१ नीलेश राणे २१४१
राजपूर - विनायक राऊत ३१०६ नीलेश राणे १०१६
कणकवली - विनायक राऊत २८६८ नीलेश राणे ३०१७
कुडाळ - विनायक राऊत ३२०२ नीलेश राणे २५०२
सावंतवाडी - विनायक राऊत ३५०४ नीलेश राणे १७९४
एकूण - विनायक राऊत २१२८६ नीलेश राणे ११९९३

- रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत 16924  मतांनी आघाडीवर । महाराष्ट्र स्वाभिमानचे नीलेश राणे पिघाडीवर

- रत्नागिरी - शिवसेनेचे विनायक राऊत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. ते ९००० मतांना आघाडीवर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रत्नागिरी : शिवसेनेच्या खासदारांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. तसेच युती झाल्यामुळे शिवसेनेला येथे फायदा होऊ शकतो. येथे ६ पैकी पाच आमदार युतीचे आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे येथे राणेंचा स्वाभिमानी पक्ष विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. दुसरीकडे स्वाभिमानला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर शिवसेनेने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने मारुती जोशी यांना उमेदवारी दिली आहे.

२०१४ निवडणुकीचा निकाल

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकांनी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे निलेश राणे यांचा पराभव केला होता.

२००९ निवडणुकीचा निकाल

२००९ मध्ये निलेश राणे यांनी शिवसेनेकडून मैदानात असलेले सुरेभ प्रभू यांचा पराभव केला होता. निलेश राणे यांना ३ लाख ५३ हजार ९१५ मते तर सुरेश प्रभू यांना ३ लाख ६ हजार १६५ मतं मिळाली होती.