एकविरा देवीचा सोन्याचा कळस चोरीला

कार्ला एकविरा देवीचा सोन्याचा मुलामा असलेला कळस चोरीला गेलाय. हा प्रकार काल रात्री  घडला आहे.

Updated: Oct 3, 2017, 01:40 PM IST
एकविरा देवीचा सोन्याचा कळस चोरीला title=

लोणावळा : कार्ला एकविरा देवीचा सोन्याचा मुलामा असलेला कळस चोरीला गेलाय. हा प्रकार काल रात्री  घडला आहे.

वेहेरगाव येथील सुप्रसिद्ध कार्ला एकविरा देवीच्या मंदिरावर असलेला कळस चोरीला गेल्याचा प्रकार उघड झालाय. हा कळस हा पूर्णतः सोन्याचा असल्याचा दावा करण्यात आलाय.  तर कळस हा तांबे, चांदी आणि पंचधातूपासून बनविलेला असून या कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला असल्याचं विश्वस्त सांगत आहे .

तसेच या कळसाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात येत आहे.