रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. मुंबईतून कोकणात आलेल्यांमुळे कोरोना विषाणूचा फैलावर होत असल्याचे पुढे आले आहे. मंगळवारी आलेल्या १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. आता कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८३ वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल रत्नागिरीत सहा तर संगमेश्वरमध्ये दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ८१,७२७ वर पोहोचली होती तर संस्थात्मक क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या १९३ वर पोहोचली आहे.
BreakingNews । रत्नागिरी जिल्ह्यात १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आणखी ८ जणांना कोरोनाची लागण । रत्नागिरी- ६, संगमेश्वर-२ जण कोरोना पॉझिटीव्ह । कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८३ वर पोहोचली ।आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू https://t.co/zUoGCpjMvJ
@ashish_jadhao— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 27, 2020
मंगळवारी एकाच दिवशी राजापूर तालुक्यात ८ कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या १३ वर गेली आहे. तालुक्यात तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या वडदहसोळ आणि कशेळी येथील त्या कुटुंबातील आणखी तिघाजणांसह एकाच दिवशी तब्बल आठजण कोरोनाबाधित सापडले. त्यामध्ये विखारे गोठणे, कशेळी, वडदहसोळ, ओणी आणि प्रिंदावण या गावांमधील रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये राजापूर तालुक्यात विखारेगोठणे येथे एक, कशेळी आणि वडदहसोळं येथे प्रत्येकी दोन असे पाच रुग्ण आढळले होते. त्यानंतर, गेले तीन दिवस तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे राजापूरवासीय काहीसे निर्धास्त होते. मात्र काल सायंकाळच्या वैद्यकीय अहवालाने राजपूरकरांची झोप उडवली आहे. वदडहसोळ येथील ज्या कुटुंबात यापूर्वी दोघे करोनाबाधित सापडले होते, त्याच कुटुंबातील आणखी दोघे करोना पॉझिटिव्ह आढळले. कशेळीतील त्याच कुटुंबातील आणखी एका रुग्णाची भर पडली आहे.