सिंचन घोटाळा : ईडीकडून आयसीआयआर दाखल, अजित पवारांच्या चौकशीची शक्यता

ईडीनं नव्यानं मनी लॉन्ड्रींग व्यवहाराची चौकशी सुरु केलीय.

Updated: May 2, 2020, 10:39 PM IST
सिंचन घोटाळा : ईडीकडून आयसीआयआर दाखल, अजित पवारांच्या चौकशीची शक्यता title=

मुंबई : बहुचर्चित सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीनी नव्यानं मनी लॉन्ड्रींग व्यवहाराची चौकशी सुरु केलीय. त्या संदर्भात ईडीनं २ एफआयआर दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळातल्या प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोनं यापूर्वी एफआयआर दाखल केलाय. 

पण त्यात कोणत्याही राजकारण्याचं नाव नाही, पण नुकतेच ईडीनं एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच आयसीआयआर दाखल केलाय. 

ईडीचा हा आसीआयआर एक प्रकारे मनी लॉन्ड्रींग तपासाचा एफआयआर आहे. त्यामधल्या वैयक्तीक नावांचा उलगडा झाला नसला तरी तत्कालिन पाटबंधारे मंत्री म्हणून अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची चौकशी होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे.