...तर लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवा, रामदास आठवले असं का म्हणाले ?

लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचे देखील त्यांनी स्वागत केले. 

Updated: May 2, 2020, 07:42 PM IST
...तर लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवा, रामदास आठवले असं का म्हणाले ?  title=

मुंबई : गो कोरोनाचा नारा देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लॉकडाऊन ३० मेपर्यंत वाढवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हा वाढता प्रादुर्भाव पाहता १७ मे पर्यंतचा लॉक डाऊन वाढवून ३० मे पर्यंत करावा असे मत आठवले यांनी व्यक्त केले. लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचे देखील त्यांनी स्वागत केले. 

जगात ३४ लाख लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या ३९ हजार एव्हढी झाली आहे. महाराष्ट्रात हा आकडा १२ हजार ५०० लोक कोरोना ग्रस्त झाले आहेत. आठवलेंनी यावर चिंता व्यक्त केली आहे.

लॉक डाऊनमुळेच आपण कोरोनाला हरवू शकतो. लोकांनी घरी राहुन लॉकडाऊन चे नियम पाळावे; गर्दी टाळावी असे आवाहन आठवले यांनी केले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे या शहरांतील मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची योग्य सुविधा द्यावी, मजुरांना भोजन वाटप करावे. शाळांच्या प्रांगणात मंडप टाकुन त्यांना भोजन द्यावे असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

लॉकडाऊन वाढवला 

जगात 'गो कोरोना'चा आम्ही नारा दिला मात्र कोरोना काही जात नाही. महारष्ट्रात ५०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र लॉक डाऊन वेळेवर केला नसता तर देशात लाखो लोकांचे कोरोना मुळे मृत्यू झाले असते असे देखील आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिल लॉकडाऊन केले. त्यानंतर १४ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉक डाऊन करण्यात आला. आता तिसऱ्यांदा १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे.