नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुस्लिम तरुणी घेणार 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

Dhule News : देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या एका मुस्लिम तरुणीने सायकलवरुन प्रवास सुरु केला आहे. ही तरुणी सायकलने दिवसातून 70 ते 80 किलोमीटर प्रवास करत आहे.

प्रशांत परदेशी | Updated: Mar 2, 2024, 11:28 AM IST
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुस्लिम तरुणी घेणार 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईहून एक मुस्लिम तरुणी पायी निघाली होती. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी धुळ्याच्या शबनम शेख नावाच्या तरुणीने मुंबईहून 1425 किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. त्यामुळे देशभरात ही तरुणी चर्चेत आली होती. आता पुन्हा या तरुणीने नवा संकल्प केला आहे. शबनम शेखने यावेळी देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे ठरवलं आहे. बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी शबनम सायकलवरुन प्रवास करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुनश्च एकदा पंतप्रधान व्हावे यासाठी शबनम शेख या मुस्लिम तरुणीने बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सायकलस्वारी सुरु केली आहे. मुंबई येथून शबनम शेख हिने सायकलवारीची सुरुवात केली होती. शबनमचे आतापर्यंत दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले असून, पुढील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तिने इंदोरकडे प्रस्थान केले आहे. 

शबनम दिवसातून 70 ते 80 किलोमीटर सायकलने प्रवास करत सुमारे सहा महिन्यांमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या महिला सक्षमीकरणमुळे आम्ही आझाद आहोत. याआधी सुद्धा मुंबई ते आयोध्या पदयात्रा केली होती. आता पुन्हा एकदा मोदी सरकार या देशात यावं या प्रार्थनेसाठी बारा ज्योतिर्लिंगसाठी निघाले आहे, असे शबनम शेखने म्हटलं आहे.