kolhapur mahalaxmi kirnotsav 2023 : फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रदूषणाने विळखा घातल्याचे दिसत आहे. कारण, देवालाही प्रदूषणाचा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सव झालेला नाही. यामुळे भक्तांची निराशा झाली आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज किरणोत्सवाचा पहिला दिवस होता. पण ढगाळ वातावरणामुळे आजचा किरणोत्सव झाला नाही. त्यामुळे भक्त काहीसे नाराज झाले. वर्षातून दोन वेळा अंबाबाई मंदिरात किरणांचा सोहळा अनुभवायला मिळतो. हा सोहळा अनुभवण्यासाठी भक्त आवर्जून अंबाबाई मंदिरात उपस्थित राहतात.
मुंबईत कृत्रिम पाऊस पाडून धुळीकरण कमी करणं शक्य आहे का, याची चाचपणी करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. मुंबईत प्रदूषण वाढल्याबद्दल मनपाच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच MMRDAच्या बांधकाम साईटस धुळमुक्त करा यासह विविध सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यायत. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. महापालिकेच्या पथकानं बांधकाम साईटसची पाहणी सुरू केलीय.
मुंबई पुण्यापाठोपाठ राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्येही प्रदूषणाने नागरिक हैराण झालेत...प्रदूषणाने श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं डॉक्टर सांगताय...श्वसन विकार किंवा दमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
मुंबईत हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. प्रदूषणाचा एक्यूआय 300 पेक्षा जास्त झालाय. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी आहे. मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणामुळे दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध आणलेत. आता मॉर्निंग वॉकला जाण्यास बंदी केली गेलीय. मुंबईतील प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईची तुलना दिल्लीशी होऊ लागलीय. मुंबईत दृश्यमानता सकाळी 11 पर्यंत चांगली होत नाही. यामुळे सकाळी जास्त अंतरावरील वस्तू, वाहन दिसत नाही.