Marrige : ST बसमुळे लग्नाचा मुहूर्त टळला; नवरदेवाची वाट पाहून नवरी वैतागली आणि...

मुहूर्तावर लग्न व्हावे असा प्रत्येकाचाच कटाक्ष असतो. यामुळे लग्नाचा महूर्त टळू नये याची खबरदारी घेतली जाते. नाशिकमध्ये (Nashik) एसटी महामंडळाच्या लेटतीफ कारभारामुळे एका नवरदेवाचा लग्नाचा मुहूर्त टळला आहे (Marrige). 

Updated: Feb 23, 2023, 04:07 PM IST
Marrige : ST बसमुळे लग्नाचा मुहूर्त टळला; नवरदेवाची वाट पाहून नवरी वैतागली आणि... title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : लाल परी अर्थात एसटी बस म्हणजे ग्रामीण भागातील जनतेचा मोठा आधार. वाहतुकीसाठी 80 टक्के जनता एसटी बसवरच अबलंबून असते. मात्र, एसटीच्या लेट लतीफ कारभाराचा जबरदस्त फटका प्रवाशांना बसतो. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, एसटीच्या या बेभरोशी कारभारामुळे एका नवरदेवाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एसटी बस उशीरा आल्यामुळे त्याच्या लग्नाचा मुहूर्त टळला (Marrige). नवरदेवची वाट पाहून नवरी दमली. 

परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे लग्नाचा मुहूर्त टाळला आहे. नाशिक मधील नांदगावच्या (Marrige) वऱ्हाडी मंडळींना मनस्ताप सोसावा लागला. पर्यायी व्यवस्था न केल्याने तीन तास बस उशिरा निघाली.  राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नाशिकच्या नांदगाव येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नाचा मुहूर्त टळला. नांदगाव येथील सतीश बिडवे यांचे मुलाचे लग्न संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात  बाबरा येथील तरुणीसह ठरले होते.

अलीकडेच सहलींसह विविध समारंभांसाठी एसटी बसेस भाडेतत्वावर दिल्या जातात. बिडवे यांनी लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडींना घेवून जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने बुक केली होती. आगाराने चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस नांदगाव ऐवजी नस्तनपूर येथे पोहचले. यामुळे बस चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बस एक तास उशिराने  निघाली. साधारण 50 किलोमीटर अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद पडली. यामुळे वऱ्हाडी संतापले.

बस नादुरुस्त होणार नाही हे लक्षात आल्यानंतर सुमारे अडीच तासाने पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात आली. या सगळ्या वेळात लग्नाचा मुहूर्त टळला. लग्नाचा मुहूर्त चुकल्याने बिडवे परिवारासह वऱ्हाडी मंडळीना मनस्ताप सोसावा लागला.

तर, तिकडे नवरीकडचे मंडळी देखील मुहूर्त टळून गेला तरी नवरदेव न पोहचल्याने त्रस्त झाली होती. नवऱ्या मुलाची वाट पाहून दमलेली  नवरीकडची मडंळी मोठ्या टेन्शन मध्ये आली होती. अखेरीस नवरदेव लग्न मंडपात पोहचल्यानंतर नवरीकडचं वऱ्हाड चिंतामुक्त झाले. लगेच हा लग्न सोहळा उरकण्यात आला.