चोरांनी लावली फिल्डिंग, पोलिसांनी केलं अलर्ट; बातमी वाचा नाहीतर होईल घात

भिवंडी-नाशिक मार्गावर गाडी थांबवू नका, पोलीस का करतायत कार चालकांना असं आव्हान? पाहा VIDEO

Updated: Sep 25, 2022, 08:34 PM IST
चोरांनी लावली फिल्डिंग, पोलिसांनी केलं अलर्ट; बातमी वाचा नाहीतर होईल घात title=

मुंबई : भिवंडी-नाशिक मार्गावर चोरांची एक टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी महामार्गावरील चारचाकी वाहनांना रोखून त्यांना लुबाडण्याचे प्रकार करतेय. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासुन सर्रास सुरु आहे. त्यामुळे अनेक कार चालकांच्या लुटमारीच्या तक्रारी समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कार चालकांना आव्हान केलं आहे. नेमकं या महामार्गावर कार चालकांसोबत असं काय होत? कार चालकांना कसं लुबाडलं जातय, जाणून घ्या.

भिवंडी-नाशिक मार्गावर गेल्या काही दिवसांपासून कार चालकांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या आहेत. या संबंधित अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर एक टोळी सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांना आहे. ही टोळी कार चालकांना रोखून त्यांना लुबाडत असल्याचे पोलीस म्हणत आहे.या टोळीचा तपास आता पोलीस करतेय?

कार चालकांना असे लुटतात?
 भिवंडी-नाशिक दरम्यानच्या मार्गात अंधार असलेल्या परिसरात ही टोळी घात घालून बसलेली असते. एखादी कार आल्याचे पाहताच तिला रोखत अनेक बहाणे करत त्यांच्या कारची तपासणी करतात. यावेळी कारच्या सीटखाली आणी स्टेअरींगसमोर ठेवलेले पैसे उचलून ही टोळी पोबारा करते. विशेष म्हणजे या टोळीतले व्यक्ती हे आरोपी वाटत नाही. त्यामुळे कार चालक त्यांच्या जाळयात फसतात आणि लुबाडले जातात.

'ही' कारणे देऊन रोखतात कार?
महामार्गावर सक्रिय असलेली ही टोळी कार चालकांना कट मारल्याचा आणि तुमचे हफ्ते थकल्याचा बहाणा करत त्यांच्याशी सुरूवातीला संवाद साधते. नंतर कारचा दरवाजा उघडल्यावर चालकाच्या कमरेला चाकू लावून लुबाडते. आणि कार घेऊन पोबारा होते. विशेष म्हणजे कार घेऊन जाणारी टोळीत एक पुरुष ड्रायव्हर आणि एक महिला असते. दिसायला हे दोघेही सर्वसामान्य घरातले वाटतात, त्यामुळे अनेक कार चालक गाडी रोखतात आणि बळी पडतात.

पोलिसांचे कार चालकांना आवाहन
भिवंडी-नाशिक मार्गावर वाढत्या लुटमारीच्या घटना पाहता आता पोलिसांनी या कार चालकांना अनेक खबरदारीच्या सुचना केल्या आहेत. भिंवडी ते नाशिक दरम्यान कोणतीही गाडी थांबवू नका. गाडीचीही काच खाली घेऊ नका, असे कळकळीचे आवाहन पोलिसांनी केलं आहे. यासह 100 नंबर अथवा 112 नंबर लावा पण गाडी थांबवू नका. तसेच तुम्ही जे पैसे बाळगता ते पैसे डिकिच्या खाली आणि सीटच्या खाली न ठेवता दुसऱ्या इतर ठिकाणी ठेवा.जेणेकरून तुम्ही लूटमारापासून वाचाल. 

 

दरम्यान, या भिवडी-नाशिक मार्गावर या लुटमारीच्या घटना सर्रास वाढत्या आहे.पोलीस या टोळीच्या मागावर आहे. मात्र अद्याप पोलिसांना यश आले आहे. मात्र या टोळींच्या लुटमारीला आणखीण कार चालक बळी पडू नये, यासाठी पोलिसांनी आता आवाहन केले आहे.