Kolhapur CCTV viral Video: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या (Kolhapur News) गांधीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद मांडल्याचं दिसून आलं होतं. सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या असलेल्या या भागात अनेक कुत्र्यांच्या आणि गाढवाच्या त्रासामुळे (Donkey Attacks) नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. गांधीनगरमध्ये गाढवाने केलेल्या हल्ल्यात दोन पुरुषांसह एक शाळकरी मुलगी जखमी झाल्याची माहिती समोर आल्याने आता खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये (GandhiNagar) गाढवाने तिघांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून हल्लात जखमी झालेल्या तिघांच्यावर उपचार सुरू झाले आहे. ही घटना काल सकाळच्या सुमारास गांधीनगर वळीवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे. गाढवाच्या हल्ल्यात लक्ष्मण कुसाळे, गोपीचंद कामरा आणि मयुरी जाधव हे तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या हल्लेखोर गाढवाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गांधीनगर मधील नागरिक करत आहेत.
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक वृद्ध व्यक्ती रस्त्याने जात असतो. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोकार सुटलेलं गाढव थांबलेलं असतं. त्यावेळी गाढवाने थेट वृद्धाला धडक दिली अन् त्याला खाली पाडलं. त्यानंतर देखील गाढवाने वृद्धाला सोडलं नाही. वृद्धावर त्याने उठू दिलं नाही. त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी वृद्धाला तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाढवाने वृद्धाला काही सोडलं नाही. त्यावेळी एका व्यक्तीने काठीने गाढवावर हल्ला केला आणि गाढवाला पळवून लावलं.
कोल्हापुरात वयोवृद्धावर गाढवाने केला हल्ला, घटना झाली कॅमेऱ्यात कैद#kolhapur #Donkey #viralvideo pic.twitter.com/zesL2iBbUM
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 8, 2023
दरम्यान, गाढवाच्या हल्ल्यामुळे दहशत सुरु केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या भागात भटक्या जनावरांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्यानं त्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना आणि बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे आता महापालिका कोणती पाऊलं उचलणार ही नाही? असा सवाल आता विचारला जातोय.