Shirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

Shirdi Sai Baba Donation :  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दानपेटीत दुपटीने वाढ, 31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह

Updated: Dec 30, 2022, 12:20 PM IST
Shirdi Sai Baba Donation : साईंच्या चरणी यंदा तब्बल 'इतक्या' कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन title=

Shirdi Sai Baba Donation :  साईबाबांच्या (Sai Baba) चरणी यावर्षी विक्रमी दान जमा झालंय. साईबाबांच्या दानपेटीत जवळपास चारशे कोटींचं दान (400 crore Donation) जमा झालं आहे. साई मंदिराच्या दानपेटीत सर्व प्रकारच्या देणग्यांसह रोज एक कोटींहून अधिक दान येत आहे. श्री साईबाबांच्या दानपेटीत 1 जानेवारी 2022 ते 26 डिसेंबर 2022 या काळात सुमारे 394 कोटी 28 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झालं आहे. या दरम्यान तीन कोटींहून आधिक भाविकांनी (Devotee) साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे..

31 डिसेंबरपर्यंत विक्रमी टप्पा करण्याची चिन्ह
31 डिसेंबर पर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हं आहेत. साईसंस्थानचे (Shri Saibaba Sansthan Trust) विदेशी चलन खात्याचा परवाना नविकरण करणं प्रलंबित असल्याने कोट्यावधी रुपयांचं विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातूनही पंधरा ते वीस कोटी रुपयांची देणगी मिळत असते. 

साई संस्थानला प्राप्त झालेल्या दानाचा तपशील 
दक्षिणा पेटी - 165 कोटी 55 लाख 12 हजार, देणगी कांऊटर - 72 कोटी 26 लाख 27 हजार, डेबीट आणि क्रेडीट कार्ड - 40 कोटी 74 लाख 75 हजार, ऑनलाईन देणगी - 81 कोटी 79 लाख 62 हजार, चेक व डीडी - 18 कोटी 65 लाख 76 हजार, मनीऑर्डर - 1 कोटी 88 लाख 109 रुपये. याशिवाय आजमितीला साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे 500 किलो सोनं, चांदी - 326 किलो 38 ग्रॅम (1 कोटी 51 लाख 75 हजार ) जमा आहे. 

31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं राहणार
नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांवर सुद्धा गर्दी होते. देशभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान सुद्धा सज्ज झाल आहे. वाढती गर्दी लक्षात घेता भक्तनिवास आणि शिर्डीतील हॉटेल फुल झाली आहेत. तर साईभक्तांना राहण्याची तात्पुरती व्यवस्था साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. भक्त निवास शेजारी असणाऱ्या मोठ्या मांडवात एक हजार भक्त राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अवघ्या पाच रुपयात गादी तर पाच रुपयात चादर साई भक्तांना मिळणार आहे.. नाममात्र शुल्क घेऊन साईभक्त शिर्डीत राहू शकतात. देशभरातून येणाऱ्या साई भक्तांना साई समाधीचे दर्शन मिळावं यासाठी 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.

हे ही वाचा : Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच

भाविकांना मास्क वापरण्याचं आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेही (Shirdi Saibaba) सतर्कतेचे उपाय सुरु केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने (Shri Saibaba Sansthan Trust) आवाहन केलं आहे.

दर्शनाला येताय, हे नियम पाळा
दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा
सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा
ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी