Corona : नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची गाठ विश्वास नांगरे पाटलांशी

याद राखा अफवा परसवाल तर...... 

Updated: Apr 1, 2020, 03:42 PM IST
Corona  : नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची गाठ विश्वास नांगरे पाटलांशी  title=
संग्रहित छायाचित्र

नाशिक :  coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही प्रशासनांकडून ,सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी दिवस-रात्र कोरोनाच्या या लढ्यात नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासा प्रयत्न करत आहेत. पण, काही अतिउत्साही मंडळींमुळे या प्रयत्नांनाही गालबोट लागत आहे. हे सर्व चित्र पाहता आता खुद्द नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्वांचा समाचार घेण्याचं ठरवलं आहे. 

परिस्थितीचं अतिशय बारकाईने निरिक्षण करणाऱ्या नांगरे पाटील यांनी परिस्थितीविषयी माध्यमांशी संवाद साधताना काही गोष्टी स्पष्ट केल्या. नाशिकमध्ये सध्याच्या घडीला जवळपास ६२५ लोकं प्रशासनाच्या निरिक्षणाखाली असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातील २१ जण येते आढळून आले आहेत ज्यांची प्रशासनाकडू चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या नाशिकमध्ये सोळाजणं क्वारंटाईन असून या प्रसंगी शासनाच्या निर्देशांनुसारच कारवाई सुरु आहे. 

अफवा पसरवू नका.... 

कोरोनाच्या दहशतीमध्ये बऱ्याच अफवाही फोफावू लागल्या आहेत. त्यामुळे अफवा पसरवू नका असं आवाहन त्यांनी सर्वांनाच केलं आहे. अन्यथा कारवाई करण्यात येण्याचा इशाराही त्यांनी दिला. शिवाय याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाबही त्यांनी सर्वांपुढे ठेवली. अफवा पसरवणाऱ्यांव्यतिरिक्त नाशिकमध्ये ७२८ लोकांवर संचारबंदी उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

एकंदरच सर्व बाबतीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून कमालीची सतर्कता बाळगली जात आहे. 

 

नागरिकांनी मंडईतही गर्दी करु नये असं सांगत त्यांनी शहरात आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असून, वाहन जप्तीच्या कारवाईलाही सुरुवात झाल्याचं सांगितलं. कोरोनाशी लढत असताना नागरिकांचं सहकार्य सर्वतोपरी महत्त्वाचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. शिवाय होम क्वारंटाईन असणाऱ्यांवर व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष ठेवलं जात असल्याचं सांगत कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्यात आपण पूर्णत: सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.