Ganeshotsav GuideLines 2021 | सरकारने घेतलेलेल्या नियमांवरुन मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये नाराजी

 नियमावलीवरुन (Ganeshotsav GuideLines 2021) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Updated: Jun 29, 2021, 04:17 PM IST
Ganeshotsav GuideLines 2021 |  सरकारने घेतलेलेल्या नियमांवरुन मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये नाराजी title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर गणेशोत्सव आला आहे. राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग कायम आहे. त्यात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर (Ganeshotsav GuideLines 2021) केली आहे. या नियमावलीवरुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने घेतलेले निर्णय हे पूर्णपणे  एकतर्फी असून त्याबाबत फेरविचार करावा, अशी विनंती सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर (Naresh DahiBavkar) यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. (Dissatisfaction among the Ganeshotsav Mandal and sculptors over the guideline to Ganeshotsav 2021 taken by the maharashtra government) 

नक्की मागणी काय? 

"सरकार आणि समिती गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र बैठका घेऊन गणेशोत्सव साजरा करतेय. यावर्षीही गेल्या 2 महिन्यांपासून गणेशोत्सवाबाबत पत्रव्यवहार केला. पण सरकारने आम्हाला काहीही प्रतिसाद दिला नाही", असं दहीबावकर यांनी म्हटलंय.

मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये असंतोष

"गृहविभागाने परस्पर नियमावली जाहीर केली. यामुळे मंडळ आणि मूर्तीकारांमध्ये नाराजीचं तसेच असंतोषाचं वातावरण आहे. सरकारने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे एकतर्फी आहे. त्यामुळे या नियमावलीबाबत सरकारने पुन्हा एकदा फेरविचार करावा", अशी विनंती दहीबावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.  

संबंधित बातम्या :

Ganpati Festival 2021 | गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर