Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झालंय. संयुक्तपणे तिनही मोठ्या पक्षांच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा सुरू झालेत. रणनिती आखली जातेय. उद्धव यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये यावर सकारात्मक चर्चा झाली.. मात्र मविआमध्ये सगळं सुरळीत असलं तरी मुख्यमंत्रीपदावरून मात्र मतभेद असल्याची चर्चा सुरू झालीय.. शिवसेना ठाकरे गट उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असावा असा प्रयत्न करत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचं विधान केलंय.. ज्या पक्षाचे आधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो असा संकेत असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांन यांनी म्हटलंय..
तर मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांची भाषा बदलल्याची पाहायला मिळतेय.. जो निर्णय आहे तो आम्ही एकत्र बसून ठरवू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्या आधी त्यांची भाषा वेगळी होती.. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरून भाजपच्या अतूल भातखळकर यांनी मविआवर जोरदार हल्लाबोल केलाय.. तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारताच राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी महायुतीकडे बोट दाखवलंय. महायुतीचे तिनही पक्ष मिळून विधानसभेला 100 च्या आत उमेदवार निवडून येतील...असं विधान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलंय...मंचरमध्ये शिवस्वराज्य यात्रेतील भाषणात त्यांनी महायुतीला टोला लगावलाय.
मविआतील मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत संजय राऊतांनी वक्तव्य केलंय...मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आगामी काळात समजेल...आम्ही चार भिंतीत बसून निर्णय घेऊ आणि मग सांगू असं सूचक विधान राऊतांनी केलंय... तसंच सत्ताधारी असो वा विरोधक चेहरा लागतोच असं राऊतांनी म्हटलंय... तर ज्या पक्षाचे आधिक आमदार निवडून येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो असा संकेत असल्याचं सांगत, पृथ्वीराज चव्हाणांनी राऊतांचा दावा फेटाळून लावला.
ज्यावेळी आघाडी म्हणुन निवडणुक लढवली जाते, त्यावेळी ज्या पक्षाचे आधिक उमेदवार निवडुन येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. असा संकेत आहे. संजय राऊत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत जे काही बोललेत त्यावर मी काही बोलणार नाही. महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकर झाले पाहीजे. जागा वाटप लवकर झाल्यास उमेदवारांना लवकर कामाला लागता येईल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. लवकर प्रचार सुरु करता येईल. दहा वर्षे त्यांना लाडकी बहीण आठवली नाही का? आता त्यांच्यासमोर त्या शिवाय काही काम राहीलेले नाही. कॅाग्रेसने कर्नाटकात ही योजना यशस्वी पणे राबवली होती असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.