'मातोश्री' आमचे दैवत, नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा - वरुण सरदेसाई

Varun Sardesai Direct warning : 'मातोश्री' आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा, असा थेट इशारा युवा नेते वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.  

Updated: Apr 23, 2022, 10:32 AM IST
'मातोश्री' आमचे दैवत, नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा - वरुण सरदेसाई title=

मुंबई : Varun Sardesai Direct warning : राणा दाम्पत्याने दिलेली वेळ टळून गेली आहे. तुम्ही अद्याप घरात आहात. तुम्ही याच, तुमच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. 'मातोश्री' आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा, असा थेट इशारा युवा नेते वरुण सरदेसाईयांनी दिला आहे. (Direct warning from Varun Sardesai to Navneet Rana and Ravi Rana)

नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम आहे. मात्र,  शिवसेना कार्यकर्ते राणांच्या घराबाहेर कालपासून ठाण मांडून आहेत. आज सकाळी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून राणांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कार्यकर्ते शांत झालेत. मात्र, 'मातोश्री'बाहेर तुमची वाट पाहत आहोत, शिवसैनिक तुमचे स्वागत करायला आतुर आहेत, असे युवा नेते वरुण सरदेसाईयांनी म्हटले आहे.

आधी शिवसैनिकांचा सामना करा नंतर मातोश्रीवर या. आमच्या दैवतावर कोणीही काही बोलले आणि आम्ही ते खपवून घेऊ, असे चालणार नाही. आधी आमचा सामना करावा लागेल, असा इशाराच शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी सकाळी 9 वाजता मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या घराबाहेर असणारी शिवसैनिकांची गर्दी पाहता ते मुळात घराबाहेर पडणारच कसे, हा मोठा प्रश्नच आहे. त्याआधी शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.  तर दुसरीकडे मातोश्रीच्या बाहेर असणारे शिवसैनिकही लढाईसाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तुम्ही याच. तुमचे चांगलेच स्वागत करु, असे सांगत राणा दाम्पत्याने कलानगरच्या सिग्नलवर पाय तर ठेवून दाखवावा, असे खुले आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.