नवी मुंबई : पुणे येथील डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी अल्पवयीन मुलगी अजूनही बेपत्ता आहे. आता या प्रकरणाला आणखी एक नव वळण लागलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या पोलिसांकडून धमक्या येत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडलांनी केली आहे.
पनवेल कोर्टात मंगळवारी दुपारी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी होती. या दरम्यान थेट कोर्ट परिसरातच मुलीच्या वडीलांना धमकी देण्यात आली. ‘शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हूँ’अशी धमकी या इसमानं दिली असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे.