पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल, पण वेग आणि पारदर्शकतेचा अभाव

पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार विकास कामं सुरु 

Updated: Jan 9, 2020, 05:28 PM IST
पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल, पण वेग आणि पारदर्शकतेचा अभाव title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडला राज्यातच नाही तर देशातलं विकासाचं मॉडेल असं लौकिक मिळालं आहे. बेस्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवडला आता स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरात जोरदार विकास कामं सुरु आहेत. मात्र ही विकास कामं नागरिकांची डोकेदुखी बनली आहेत.

स्थळ : सुदर्शननगर - काम - ग्रेड सेपरेटर 
स्थळ : गोविंद गार्डन चौक - काम - सबवे 
स्थळ : वाकड - उड्डाणपूल - ग्रेड सेपरेटर 
स्थळ : निगडी - उड्डाणपूल 
स्थळ : पिंपरी ते दापोडी - काम मेट्रो 

पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेली ही कामे. यातला मेट्रो प्रकल्प राज्य आणि केंद्र सरकारचा महत्वकांक्षी आणि शहरवासीयांना हवा हवासा. त्यामुळे  या कामाचा त्रास सहन करायला नागरिक तयार आहेत. मात्र शहाराच्या इतर भागात सुरु असलेली सर्वच विकास कामं ही नागरिकांची डोकेदुखी ठरते आहे. सत्ताधारी आणि पालिका प्रशासन कामामध्ये वाढीव खर्च मिळावा यासाठी जाणीवपूर्वक कामांमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांनी ही कामे लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली आहे.

कामांच्या दिरंगाईबद्दल महापालिका प्रशासन काही बोलत नसलं तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळले असून आम्ही शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असून लवकरच कामं पूर्ण करू असा दावा केला आहे.

वेगाने विकसित झालेल्या पिंपरी चिंचवडला यापूर्वीच बेस्ट सिटी पुरस्काराने केंद्र सरकारने गौरवलं आहे. आता या बेस्ट सिटीची वाटचाल स्मार्ट सिटी कडे होते आहे. मात्र ही वाटचाल होताना होणाऱ्या कामांना वेग ही हवा आहे आणि त्यात पारदर्शकताही हवी, मात्र सध्या तरी या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे असंच म्हणावं लागेल