एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ आहे का?

 उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यातील साक्री एसटी डेपोतील (Sakri ST Depo) कर्मचारी कमलेश बेडसे (Kamlesh Bedse) यांनी आत्महत्या केली.  

Updated: Aug 28, 2021, 09:24 PM IST
एसटी कर्मचाऱ्यांकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ आहे का? title=

मुंबईहून देवेंद्र कोल्हटकरसह प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यातील साक्री एसटी डेपोतील (Sakri ST Depo) कर्मचारी कमलेश बेडसे (Kamlesh Bedse) यांनी आत्महत्या केली. पगार अनियमिततेने होते असल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. या आत्महत्येनंतर घुळ्यात एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. वातावरण चांगलंच पेटलंय. या एसटी कर्मचाऱ्यांनी बस तिथेच उङ्या करुन ठेवल्या. या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पगारासाठी झगडावं लागतंय. सरकार  एसटी कर्मचाऱ्यांकडे  लक्ष देणार आहे का, असा संतप्त सवाल विचारला जातोय. (dhule sakri msrtc bus driver committed suicide dut to irregular salary)
 
नक्की प्रकरण काय?

एसटी कर्मचा-यांचा दोन महिन्यांचा पगार थकलाय. आर्थिक अडचणीमुळे अनेकांनी सावकारी कर्ज काढलंय. अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात एसटी सुरू नसल्यानं पगार थकल्याचं कारण देण्यात आलंय. परिस्थिती एवढी गंभीर आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन सरकार करतंय.

एसटी महामंडळाला 500 कोटी रूपये देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सणवार तोंडावर आहेत. अशा वेळी एसटी कर्मऱ्यांच्या घरात खडखडाट आहे. किमान महिन्याचा पगार तरी एसटी कर्मचाऱ्यांना तातडीनं मिळायलाच हवा आणि त्यांच्या घरची चूलही पेटायलाच हवी.